नवोदय विद्यालयाच्या प्रवेश चाचणीमध्ये उभादांडा नं १ शाळेच्या दोन विद्यार्थ्यांचे यश.

नवोदय विद्यालयाच्या प्रवेश चाचणीमध्ये उभादांडा नं १ शाळेच्या दोन विद्यार्थ्यांचे यश.

वेंगुर्ला.

    जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रवेश निवड चाचणीमध्ये उभादांडा नं. १ शाळेच्या पाचवीतील कु. अवनिश चंद्रहास नार्वेकर व ऋषभ राकेश तिरोडकर या दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
      तसेच त्यांना वर्गशिक्षक एकनाथ जानकर, सुहास रेडेकर, अनिशा झोरे मुख्याध्यापक गणेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, विस्तार अधिकारी सुनिता भाकरे, केंद्रप्रमुख भागोजी अडूळकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन नरसुले, अण्णा रेडकर, शांताराम भोने तसेच पालक व शिक्षण प्रेमींनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.