ओम सेमवालकडून सेबेस्टीयन सालझर पराभूत

ओम सेमवालकडून सेबेस्टीयन सालझर पराभूत

मुंबई 

 

   मुंबई येथे सुरू असलेल्या जेएसडबल्यू इंडिया खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या ओम सेमवालने मेक्सिकोच्या सेबेस्टीयन सालझरचा धक्कादायक पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.ओम सेमवाल आणि सालझर यांच्यातील हा सामना पाच गेम्समध्ये झाला आणि सेमवालने सेबेस्टीयनचा ११-६, ११-९, ८-११, १०-१२, १९-१७ अशा ३-२ गेम्समध्ये पराभव केला. मात्र, दुसऱ्या एका सामन्यात इजिप्तच्या इब्राहीम इल्काबेनीने भारताच्या सुरजकुमार चांदचा १२-१४, ११-४, ११-१, ११-६ अशा ३-१ अशा गेम्समध्ये पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात इजिप्तच्या यासिन यासिन शोहडीने फ्रान्सच्या मॅन्युअल पॅक्वेमारचा ३-१, स्वीसच्या आंब्रे अॅलिनसेकने नेदरलँडच्या स्लुइसचा ३-१, हाँगकाँगच्या वाँगने अयान वझिरअलीचा ३-० असा पराभव केला. सोफिया मॅटोसने शमिना रियाझचा ३-० तसेच मॅथ्यू लेईने डॅनिली रेचा ३-० असा पराभव केला.