खासगी उद्योजक व बेरोजगार उमेदवारांसाठी ५ सप्टेंबर रोजी रोजगार मेळावा.

खासगी उद्योजक व बेरोजगार उमेदवारांसाठी ५ सप्टेंबर रोजी रोजगार मेळावा.

सिंधुदुर्ग.

   जिल्ह्यातील खासगी उद्योजक व बेरोजगार उमेदवारांसाठी Apprenticeship रोजगार मेळावा मंगळवार दि. 5 सप्टेंबर रोजी आयोजित केले आहे. आयटीआय पूर्ण केलेल्या उमेदवारांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता चे प्र. सहायक आयुक्त ग.पां. चिमणकर यांनी  केले आहे.
    जिल्ह्यातील आयटीआय पूर्ण केलेल्या नोकरी इच्छूक उमेदवारांना खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग, प्रशासकीय संकुल, तळ मजला, ए ब्लॉक, जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, ओरोस येथे सकाळी 10 ते दु. 1 या वेळेत Apprenticeship रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
   एकूण 42 पदांसाठी रिक्तपदे (Vacancies) प्राप्त झालेली आहेत. तरी नोकरी इच्छुक आयटीआय पूर्ण केलेल्या उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या छायाप्रती, बायोयाटा व पासपोर्ट साईस फोटोसह स्वखर्चाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02362 228835, ईमेल आयडी- sindhudurojgar@gmail.com  वर संपर्क साधावा.
   या रोजगार मेळाव्यामध्ये आयटी आयमध्ये विविध कोर्सचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना खालील खासगी आस्थापनेवर रोजगार उपलब्ध होणार आहेत.