आमदार केसरकरांच्या वाढदिवशी सावंतवाडीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद......

आमदार केसरकरांच्या वाढदिवशी सावंतवाडीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद......

सावंतवाडी 

 


     सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ आणि युवा रक्तदाता संघटना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या नेत्याला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. शिबिराचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिबिरादरम्यान उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल रक्तपेढीचे अधिकारी प्रशांत सातार्डेकर, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, अनिल खाडे, गोविंद श्रीरामे, रवीना लोहंबरे आणि प्राची राणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.याप्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, "दीपक केसरकर हे अत्यंत सरळ, साधे आणि कधीही कोणाचे वाईट न चिंतणारे व्यक्तिमत्त्व आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी अफाट कामे केली, मात्र त्याचे श्रेय त्यांनी कधीही स्वतःकडे घेतले नाही. केसरकरांसारखा आमदार या मतदारसंघाला मिळणे कठीण आहे." त्यांनी केसरकरांना आगामी काळात मंत्रीपद मिळावे, अशी सदिच्छाही व्यक्त केली. कार्यक्रमात माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख अ‍ॅड. निता सावंत-कविटकर आणि प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांनीही मनोगत व्यक्त करत केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या सामाजिक उपक्रमाला शहरप्रमुख बाबू कुडतरकर, रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा आमदार प्रतिनिधी देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, अ‍ॅड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, पंचायत समिती सदस्या प्रणाली टिळवे, सुप्रिता धारणकर, भारती परब, पूजा नाईक, शगुप्ता पडवेकर, शितल नाईक, निलम कुमठेकर, राजश्री निर्गुण, विश्वास घाग, गजानन नाटेकर आणि बासीत पडवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.शिबिर यशस्वी करण्यासाठी संदीप निवळे, वसंत सावंत, अ‍ॅड. प्रसाद नाटेकर, पंकज बिद्रे, क्रिश सावंत, भास्कर आमुणेकर, भगवत पोळ आणि मेहर पडते यांच्यासह युवा रक्तदाता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.