वेंगुर्ला पोलिसांची अवैद्य दारू वाहतुकीवर मोठी कारवाई; एकूण १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

वेंगुर्ला पोलिसांची अवैद्य दारू वाहतुकीवर मोठी कारवाई; एकूण १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

वेंगुर्ला.

   वेंगुर्ला एस.टी स्टँड येथे सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ला पोलिसांनी बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई केली असून दुचाकीसह एकूण 1 लाख 4 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणात ऑलविन अंतोन फर्नांडिस (39 वर्षे) राहणार पेडणे गोवा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   सदर कारवाई वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग खडपकर यांनी कारवाई केली आहे.