आ.वैभव नाईक, खा.विनायक राऊत यांच्या मुळेच तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहचल्या : अतुल बंगे. कवठी येथे शिवसेना आयोजित मोफत कामगार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन.
कुडाळ.
बांधकाम कामगार,संजय गांधी निराधार योजना, दशावतारी कलाकार मानधन आणि शासकिय योजना ह्या फक्त जागृत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या मुळेच तळागाळातील लोकांपर्यंत पोहचल्या असे प्रतिपादन शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केले.
कवठी शिवसेना आयोजित कामगार नोंदणी शुभारंभ शिवसेनेचे अतुल बंगे व कवठी उपसरपंच त्रुतुजा खडपकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी श्री बंगे बोलताना म्हणाले आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत हे गावा गावात आणि घरा घरात पोचुन लोकांना ज्या योजना असतील आणि अपेक्षित विकास असेल तो करत आले आहेत म्हणुनच लोक आपला लोकप्रतिनिधी हक्काचा असल्याची भावना निर्माण करत आहेत असे सांगून कवठी गावाने खा राऊत, आमदार श्री नाईक यांच्या खंबीर पाठीशी उभं रहायचं ठरवल आहे विकास आणि आपुलकी, सन्मान हीच माणसे देऊ शकतात म्हणून कितीही नवरे भाशिंग बांधून तयार असले तरी आम्हाला काही फरक पडत नाही असे सांगुन बंगे म्हणाले पाऊस लागला कि बेडक डराव डुरुव करायला लागतात तसेच निवडणुका आल्या कि खोटे प्रवेश आणि वल्गना ऐकायला येतात तशी परिस्थिती सध्या आहे असे सांगून श्री बंगे म्हणाले कवठी गावातील लोकांचा विश्वास आमच्या वरच आहे म्हणूनच आज शिवसेना शाखा कवठी येथे कामगार नोंदणी कार्यक्रम आमदार वैभव नाईक यांच्या सुचनेनुसार आणि त्यांच्या सहकार्यातुन होत आहे असेही श्री बंगे यांनी सांगितले.
यावेळी मा. सरपंच रुपेश वाड्येकर,कवठी उपसरपंच त्रुतुजा खडपकर,नेरुर शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, युवासेनेचे रूपेश खडपकर, कट्टर शिवसैनिक दीपक सांगळे, संतोष वाड्येकर, सविता बांदेकर, नंदकिशोर वाड्येकर, ममता वाडयेकर, भुषण बांदेकर उपस्थित होते.