वेंगुर्ला शाळा नं. ४ ला ‘डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी ईनोवेशन लॅब’ मंजूर. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव परब यांच्या हस्ते लॅबचे उद्घाटन.

वेंगुर्ला शाळा नं. ४ ला ‘डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी ईनोवेशन लॅब’ मंजूर.   शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव परब यांच्या हस्ते लॅबचे उद्घाटन.


वेंगुर्ला.

जि.प.वेंगुर्ला शाळा नंबर ४ या शाळेला शासनाकडून वेगवेगळ्या सुमारे ५०५ लहान मोठे वैज्ञानिक प्रयोग असलेल्या साहित्याची ‘डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी ईनोवेशन लॅब’ मंजूर झाली.शाळेत या लॅब चे उद्घाटन आज राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वासुदेव उर्फ बाळा परब यांच्या हस्ते शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत करण्यात आले.या कार्यक्रमानिमित्त शालेय स्तरावर आयोजित विज्ञान प्रदर्शन व रांगोळी स्पर्धेलाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वेंगुर्ला शाळा नं.४ मध्ये एक ते सातवीपर्यंत वर्ग असून विद्यार्थ्यांचा विविध विषयांमध्ये आणि स्पर्धांमध्ये सहभाग असतो. शाळेतील प्रगती लक्षात घेता शासनाकडून ही अध्यायावत अशी लॅब विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक गुणांना वाव मिळण्यासाठी मंजूर केली आहे.आज या लॅबचे उद्घाटन करण्यात आले.
   यावेळी विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन मध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वेदांत नाईक व वेद वेंगुर्लेकर यांच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक, भूमिका असनकर द्वितीय तर हंसिका वजराटकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला.तर विज्ञान थीम असलेल्या रांगोळी स्पर्धेत तनिष्का जाधव हिने प्रथम क्रमांक, चिन्मयी  किनळेकर द्वितीय क्रमांक, श्रेया किनळेकर हीने तृतीय क्रमांक मिळविला. चिन्मयी परब व हंसिका वजराटकर यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
   या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष परब यांनी तर प्रास्ताविक सुनंदा खंडागळे आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संध्या बेहरे यांनी केले.