वेंगुर्ला भाजपा च्या वतीने ४५ वा स्थापना दिवस साजरा.

वेंगुर्ला भाजपा च्या वतीने ४५ वा स्थापना दिवस साजरा.
वेंगुर्ला भाजपा च्या वतीने ४५ वा स्थापना दिवस साजरा.

वेंगुर्ला.

   जनसंघापासुन सुरु झालेला प्रवास आता जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष होण्यापर्यंत येवून पोचला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल वेगाने सुरु आहे. नरेंद्र मोदी यांनी " सबका साथ - सबका विकास - सबका विश्वास " या तत्वावर राज्यकारभार करत गोरगरीबांच्या कल्याणाचे अनेक कार्यक्रम प्रत्यक्षात आणले. स्थापना दिनाच्या निमित्ताने जनसंघाच्या कार्यासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्मरण करणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हा उपाध्यक्ष अँड.सुषमा खानोलकर यांनी केले.
   वेंगुर्ला भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतमाता व डाॅ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . तसेच कार्यालयाच्या बाहेर तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा फडकविण्यात आला .
     यावेळी साई प्रसाद नाईक (जिल्हा निमंत्रित सदस्य), प्रसन्ना लक्ष्मण देसाई (जिल्हा उपाध्यक्ष), वृंदा गवंडळकर ( जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा), राजन गिरप (जिल्हा नियोजन सदस्य), विनायक गवंडळकर (तालुकाध्यक्ष ), बाबली वायंगणकर (तालुका सरचिटणीस), जयंत मोंडकर ( तालुका चिटणीस), सुजाता पडवळ (तालुकाध्यक्ष महिला मोर्चा), हसिनाबेन मकानदार (अल्पसंख्यांक मोर्चा), श्रेया मयेकर (शहराध्यक्ष महिला मोर्चा), रसिका सुनील मठकर ( सरचिटणीस महिला मोर्चा ), प्रशांत आपटे ( शक्तिकेंद्र प्रमुख), शरद चव्हाण ( ओबीसी सेल अध्यक्ष ) रवि शिरसाट ( बूथ प्रमुख), पुंडलिक हळदणकर( बूथ प्रमुख), छोटू कुबल (कार्यालय प्रमुख वेंगुर्ला), प्रणव वायंगणकर, शरद मेस्त्री उपस्थित होते.