मालवण कट्टा येथे १७ मार्च पासून श्री विठल रखुमाई व लक्ष्मीनारायण पुनःप्रतिष्ठापना सोहळा.

मालवण कट्टा येथे १७ मार्च पासून श्री विठल रखुमाई व लक्ष्मीनारायण पुनःप्रतिष्ठापना सोहळा.

मालवण.

   तालुक्यातील कट्टा येथील श्री विठल रखुमाई व लक्ष्मीनारायण पुनःप्रतिष्ठापना सोहळा १७ मार्च ते २१ मार्च या कालावधीत होणार आहे. १७ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून कलश व श्री देवतांची मूर्ती मिरवणूक होणार आहे. १८ रोजी सकाळी ७:३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत प्रायाच्छित, पुण्याहवाचन, आचार्य वरण, स्थलशुद्धी, मंडलदेवता स्थापना, जलाधिवास शांती, शांतीहोम होणार आहे. सायंकाळी ५ वाजल्यापासून स्थानिक महिलांचे भजन, रात्री ७ ते १० वा. संजय दळवी तळेगाव यांचे भजन, नंतर शहाजान शेख सावंतवाडी यांचे भजन होणार आहे. रात्री १० ते ११ स्थानिकांची भजने होणार आहेत.१९ रोजी सकाळी ७.३० ते दुपारी १.३० वा. स्थलशुद्धी, मंडल देवता पूजन, अग्नी स्थापना, वास्तू होम, ग्रहयज्ञ, पर्याय होम, शिखरकलश हवन, दुपारी ११ ते ११:३० वा. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य संस्थान मठ संकेश्वर करवीर श्री परमपूज्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती व स्वामीजी संकेश्वर यांच्या शुभहस्ते शिखर कलश स्थापना, सायंकाळी ५ ते ६.३० वाजता स्थानिक महिला अभंगवाणी, रात्री ७ ते १० विश्वविख्यात भरतनाट्यम् नृत्य आचार्य पार्वतीकुमार कांबळी यांच्या शिष्य डॉ.सुचिता भिडे चाफेकर यांचा भरतनाट्यम् कार्यक्रम होणार आहे.बुधवार २० रोजी सकाळी ७:३० ते दुपारी १.३० दरम्यान स्थलशुद्धी, मंडल देवता पूजन तत्त्वन्यास, प्रतिष्ठापना, महापूजा, बलिदान, पूर्णाहुती, नैवेद्य, आरती, सामूहिक प्रार्थना, सायंकाळी ५ ते ६ वा. स्थानिक महिलांची अध्यात्मिक नृत्य सेवा, सायं. ७.३० ते रात्री ११.३० दरम्यान जिल्हयातील नामांकित भजनी बुवांचा संगीत भजन संध्या कार्यक्रम होणार आहे. गुरुवार २१ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती, १.३० ते ३.३० तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता श्री देव रवळनाथ प्रसादिक भजन मंडळ फोंडा (बुवा साहिल पारकर) यांचे भजन, रात्री ९ वाजता वालावलकर दशावतार कंपनीचा 'रामराज्याभिषेक' हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.