माडखोल येथील सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवस लाक्षणिक उपोषण.

माडखोल येथील सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवस लाक्षणिक उपोषण.

सावंतवाडी.

   मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शांततेच्या मार्गाने मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांना पाठिंबा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून माडखोल येथील सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवस लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. या उपोषणाची सुरुवात शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
   यावेळी "आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे" "कोण सांगतोय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही" "जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है" अशा घोषणा देण्यात आल्या. कुडाळ येथे होणाऱ्या जरांगे पाटील यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे. दरम्यान माडखोल गावातील मराठा समाज बांधव आपले राजकीय व वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले आहेत.
    यावेळी माडखोल उपसरपंच कृष्णा राऊळ, माजी सरपंच संजय लाड, आनंद राऊळ, राजन राऊळ, सूर्यकांत राऊळ, कृष्णा राऊळ, योगेश लाड, अमित राऊळ, मेघनाथ राऊळ, अजित नाईक, प्रकाश देसाई, भरत राऊळ, गोविंद दळवी, विश्वास राऊळ, सुबोध राऊळ, विशाल राऊळ, निखिल गावडे, तेजस राऊळ, सुनिल राऊळ, सत्यवान राऊळ, यशवंत गावडे, कृष्णा राऊळ, विनायक राऊळ, स्वप्निल लातये, सुरज लातये, आत्माराम लातये, विजय बंड, नामदेव राऊळ, बापु राऊळ, लखन आडेलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.