भोमवाडी ग्रामपंचायतच्या LGD कोड साठी करण्यात आलेले आंदोलन पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्थगित

आजगाव ग्रामपंचायतमधून 1976 साली विभाजन होवून भोमवाडी ग्रामपंचायत स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. भोमवाडी ग्रामपंचायत 190764 हा स्वतंत्र LGD कोड आहे. सदरचा कोड INACTIVE झाल्याने भौमवाडी ग्रामपंचायत EGRAMSWARAJ या पोर्टलवर दिसत नसल्याने ग्रामपंचायत 15 वा वित्त आयोग बिले खर्च करता येत नाही. यासंदर्भात भोमवाडी सरपंच अनुराधा कृष्णा वराडकर यांनी 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सहकारी व ग्रामस्थांसह उपोषण करण्याचा इशारा दिला होता परंतु पालकमंत्री नितेश राणे यांच्या आश्वासनानंतर सदर उपोषण स्थगित करण्यात आले.
पुर्वी शासनाकडुन महसुल गाव नसताना ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आलेली. सध्या सदर ग्रामपंचायत महसूल गाव आजगावच्या हद्दीत वसलेली आहे. गावचा प्रथम नागरीक सरपंच म्हणुन गावविकासाची 15 वा वित्त आयोग अंतर्गत कामे करता येत नाही. त्यामुळे जनतेस न्याय देणारे गावविकासकार्य मी करू शकत नाही. मी गावचा प्रथम नागरीक सरपंच या नात्याने कर्तव्यदक्ष नागरीक म्हणुन हा उपोषणाचा इशारा दिला होता असे सरपंच अनुराधा कृष्णा वराडकर यांनी सांगितले परंतु यावर लवकरात लवकर तोडगा काढू असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले आहे