आयटीआय ओरोस येथे यांत्रिक मोटारगाडी निदेशक पदासाठी अर्जाचे आवाहन, २८ सप्टेंबरपर्यंत मुदत

आयटीआय ओरोस येथे यांत्रिक मोटारगाडी निदेशक पदासाठी अर्जाचे आवाहन, २८ सप्टेंबरपर्यंत मुदत

सिंधुदुर्ग, दि. २१

 

       पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस येथे रिक्त असलेल्या यांत्रिक मोटारगाडी निदेशक पदावर तात्पुरत्या स्वरूपात घड्याळी तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार असून, इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.रिक्त पद व आवश्यक शैक्षणिक अर्हतेची माहिती शासनाच्या महास्वयंम पोर्टलवर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी महास्वयंम पोर्टलवर अर्ज करावा किंवा संस्थेकडे २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत टपालाने अथवा हस्तदेय अर्ज सादर करावा.अर्ज केलेल्या उमेदवारांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सर्व शैक्षणिक व आवश्यक अर्हतेची मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतींसह संस्थेत उपस्थित राहावे.अधिक माहितीसाठी ०२३६२-२९५८०८ किंवा ९४२२५९६०३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस यांनी कळविले आहे.