श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे मधील दहावी परीक्षेची बैठक व्यवस्था

वेंगुर्ला
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहेत.वेतोरे केंद्र क्रमांक ८३०३ वरील परीक्षा वेंगुर्ला तालुक्यातील श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे या शाळेत घेण्यात येणार असून परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था B020934 ते B021084 पर्यंत करण्यात आली आहे.सदर केंद्रावर श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग, कृषीरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग, रायसाहेब डॉ. रा. धो. खानोलकर हायस्कूल मठ ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग व कै. प. ना. मा. हायस्कूल तेंडोली ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग या प्रशालेतील विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.तरी याची संबधित विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी असे वेतोरे केंद्र संचालक यांनी कळविले आहे.