किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दिवाळी विशेष कार्यशाळा

किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दिवाळी विशेष कार्यशाळा

 

 

वेंगुर्ला 


      किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्यधाम, उभादांडा, वेंगुर्ला येथे दिवाळी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दिनांक 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 8.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत पार पडणार आहे.
       या कार्यशाळेत १० ते १५ वर्ष वयोगटातील मुलांना सहभागी होता येईल. सहभागी होण्यासाठी प्रवेश फी केवळ ₹200/- ठेवण्यात आली आहे. मात्र, प्रथम येणाऱ्या फक्त ३० जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे.


नोंदणीसाठी संपर्क 

खेमराज कुबल - 8421699797
यासिर मकानदार - 7083222422
माझा वेंगुर्ला - 8400222422


     पालकांनी आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ही संधी नक्कीच साधावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.