वेंगुर्ला येथे अवैध गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक; २० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त. वेंगुर्ला पोलिसांची धडक कारवाई.

वेंगुर्ला येथे अवैध गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक; २० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त.  वेंगुर्ला पोलिसांची धडक कारवाई.

वेंगुर्ला.
  
   तालुक्यात रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक महिला गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात होती.पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार तिला पकडून मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.
    याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक महिला मोचेमाड पुलाच्या बाजूला वेंगुर्ला ते शिरोडा जाणाऱ्या रस्त्यावर अणसुर तिठ्याच्या बाजूला गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली होती. 
   त्याबाबत पोलीस निरीक्षक अतुल जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, पो. हवालदार चव्हाण, पोलीस हवालदार वेंगुर्लेकर, पोलीस हवालदार वेंगुर्लेकर, पोलीस कॉन्स्टेबल खडपकर, पोलीस कॉन्स्टेबल सावंत, पोलीस कॉन्स्टेबल कांडर, पोलीस कॉन्स्टेबल पालकर, पोलीस हवालदार पाटील, यांनी पंच घेऊन सापळा रचून दिनांक १५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आरोपी महिला वैशाली प्रकाश आसोलकर (३५) रा. रेडी सुखळभाटवाडी ता. वेंगुर्ला हिला तिच्या ताब्यातील ६३६ ग्रॅम वजनाचा एकूण अंदाजे किंमत २० हजार रुपये किमतीचा गांजा व दुचाकी वाहन अंदाजे किंमत ५० हजारासह ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली असून आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती विद्या जाधव हे करीत आहे.