परुळे शाळेत किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन सत्र संपन्न

परुळे शाळेत किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन सत्र संपन्न


    परुळे शाळा नंबर 3 येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. परुळे येथे शालेय विद्यार्थिनींना परुळे उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी सौ. काजल परब यांनी किशोरवयीन मुलींना जाणवणाऱ्या समस्या व त्यासंदर्भात घेतली जाणारी दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित असलेल्या पालकांनाही आपल्या पाल्यांना आवश्यक असलेले काळजी कशी घ्यायची, किशोरवयीन मुलींना समजावून घेऊन, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे याबाबत माहिती दिली. तसेच सध्या  शासनाची सुरू असलेली क्षयरोग मुक्ति भारत ही मोहीम  त्यानिमित्त सर्वांच्या उपस्थितीत शपथ घेण्यात आली. 
    याप्रसंगी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सानिका परुळेकर, मुख्याध्यापक प्रविणा दाभोलकर,  पोलीस पाटिल जान्हवी खडपकर, शिक्षक दत्तात्रय म्हैसकर, रविन्द्र गोसावी, शालीक, पाटिल यांसह पालक व विद्यार्थी या सर्वांची उपस्थिती होती.