दशांश अपूर्णांक ऑलिंपिक स्पर्धेत वेंगुर्ले केंद्र शाळा नं १ प्रथम

दशांश अपूर्णांक ऑलिंपिक स्पर्धेत वेंगुर्ले केंद्र शाळा नं १ प्रथम


वेंगुर्ले 
    शालेय गणित सुधार उपक्रमांतर्गत अध्ययन संस्था मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय दशांश अपूर्णांक ऑलिंपिक स्पर्धा २०२४ - २५ या स्पर्धेत वेंगुर्ले केंद्र शाळा नं १ या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरीमध्येही प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे. वेंगुर्ले भटवाडी येथील श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये वेंगुर्ले केंद्र शाळा नंबर १ मधील वेद वेंगुर्लेकर, द्वारका राऊळ, वेदांत नाईक, सार्थक यादव, मयंक नंदगडकर, निल पवार, परिणीता केरकर, अवनी हरमलकर, कौस्तुभ परब, तन्मय शितोळे हे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर यांचे मार्गदर्शन लाभले.