वेंगुर्ला बागायतवाडी येथील हॉटेल गोलवन आगीच्या भक्ष्यस्थानी; लाखोंचे नुकसान.

वेंगुर्ला.

   वेंगुर्ला बागायतवाडी येथील हॉटेल गोलवनला आज दुपारी १.०० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.या आगीमध्ये हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून सुमारे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
   आग लागल्याचे समजताच याबाबत वेंगुर्ला नगर परिषदेला कळविले असता.वेंगुर्ला नगर परिषदेचा वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाला.यावेळी वेंगुर्ला नगर परिषदेचा अग्निशमन बंब नादुरुस्त असल्याने वॉटर टँकरच्या साहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.मात्र दुपारच्या सुमारास लागलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने सावंतवाडी नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले.यावेळी घटनास्थळी सावंतवाडीचा अग्निशमन बंब दाखल झाला असून आग विझविण्यासाठी वेंगुर्ला नगर परिषदेचे कर्मचारी व सावंतवाडी अग्निशमन दलाचे कर्मचारी यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.