आमदार नितेश राणे यांचा दोडामार्ग मध्ये भव्य सत्कार.

आमदार नितेश राणे यांचा दोडामार्ग मध्ये भव्य सत्कार.


दोडामार्ग
       दोडामार्ग तालुक्याची निर्मिती राणे साहेबांनी केली त्यामुळे या तालुक्याविषयी मला विशेष आस्था आहे. कोणाच्याही आडून न येता थेट माझ्याशी संपर्क करा. मंत्रिपदाचा वापर करून तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार असा विश्वास राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी दोडामार्ग येथे दिला. राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांचे दोडामार्ग शहरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने ना. नितेश राणे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राणे यांनी पुष्पहार अर्पण केल्या नंतर भाजपा तालुका कार्यालयात  नितेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 
     माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा बैंक चेअरमन मनीष दळवी, संचालक महेश सारंग, माजी जि. प. सभापती प्रमोद कामत, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेवक संतोष नानचे, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते.
        यावेळी ना. नितेश राणे म्हणाले, माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. कोणी काहीही सांगेल ते मान्य करेन इतक्या हलक्या कानाचा मी नाही. प्रत्येक बाबीची खातरजमा केली जाईल. भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पक्ष यांच्याकडून प्रस्तावित केलेली कामे प्राधान्याने केली जातील. विरोधकांनाही जर विकासाच्या प्रक्रियेत यायचे असेल तर त्यांनी महायुतीमध्ये यावे असे आवाहन केले. यावेळी विलास सावंत, अनिल शेटकर, गोपाळ गवस, भाजपा महिला तालुकाध्यक्ष दिक्षा महालकर, संध्या प्रसादी, सौ. पार्सेकर, दिव्या देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष युवा मोर्चा पराशर सावंत, दिपक गवस, नगरसेवक, संरपच आदी उपस्थित होते.