कारिवड्यात एनसीएमसी कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, एसटी प्रवाशांना गावातच सुविधा

कारिवड्यात एनसीएमसी कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, एसटी प्रवाशांना गावातच सुविधा

 

ओटवणे

 

      कारिवडे गावातील एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत कारिवडे आणि विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एसटीच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड शिबिराला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावातच एनसीएमसी कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सरपंच सौ. आरती अशोक माळकर, विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर, भाजप आंबोली मंडळ उपाध्यक्ष अशोक माळकर, मनोहर गुरव, मानकरी शांताराम गांवकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रतिभा जाधव, ग्रामपंचायत अधिकारी भरत बुंदे, देवेन डिजिटल सेंटरचे कर्मचारी रश्मी रामकृष्ण देवुसकर, देवेन जाधव, सचिन गोसावी, रामचंद्र पालव तसेच ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.