पणदूर संविता आश्रम येथे १० डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा.

पणदूर संविता आश्रम येथे १० डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा.

कुडाळ.

   जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदूर यांच्यावतीने रविवार १० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ३.३० या वेळेत जेष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांनी दिली आहे. ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा या कार्यक्रमाची माहिती देण्याकरिता अध्यक्ष संदीप परब यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
    यावेळी पुढे बोलताना परब यांनी हा कार्यक्रम जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती. मुल्ला तसेच डॉ रुपेश पाटकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले.