वेंगुर्लेत २१ मार्चपासून 'गरूडझेप महोत्सव'

वेंगुर्लेत २१ मार्चपासून 'गरूडझेप महोत्सव'

 

वेंगुर्ले

 

    शहरातील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ राऊळवाडातर्फे सलग चौथ्या वर्षी 'गरूडझेप महोत्सव २०२६' अंतर्गत 'झेप सामाजिक कार्याची' या संकल्पनेतून २१ ते २३ मार्च या कालावधीत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीसोबतच कला आणि क्रीडा गुणांना वाव दिला जाणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.महोत्सवाचा शुभारंभ २१ मार्चला सकाळी ९ वाजता मीना पार्क, राऊळवाडा येथे रक्तदान शिबिराने होईल. त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता राऊळवाडा येथील नायरा पेट्रोल पंपानजीक जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ८ हजार, ५ हजार आणि ३ हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी स्वप्नील पालकर (८४८२८३५३९३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.रविवार, २२ मार्चला सकाळी १० वाजता सातेरी मंदिर नजीकच्या शाळा नं. ४ येथे जिल्हास्तरीय चित्रकला व रंगभरण स्पर्धा चार गटात होईल. यामध्ये पहिली ते दुसरीसाठी रंगभरण, तिसरी ते चौथीसाठी 'कुंडीतील फुलझाडे, पाचवी ते सातवीसाठी 'वासुदेव' आणि आठवी ते दहावी गटासाठी 'सार्वजनिक विहीर' असे विषय ठेवण्यात आले आहेत. सायंकाळी ५ वाजता मोड आलेल्या कडधान्यावर आधारित पाककला स्पर्धा होईल. या स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी मंगेश परब (८१४९६१७२०९) यांच्याशी संपर्क साधावा. याच दिवशी रात्री ८ वाजता चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ आयोजित 'जलवा २०२६' आणि 'वेंगुर्ला क्वीन २०२६' या स्पर्धा पार पडतील. या स्पर्धेतील विजेत्यांना ५ हजार, ३ हजार व २ हजार अशी रोख बक्षिसे दिली जाणार असून अधिक माहितीसाठी बापू वेंगुर्लेकर (९६०४२६२७३३) यांच्याशी संपर्क साधता येईल.महोत्सवाच्या सांगता दिनी, २३ मार्च ला सायंकाळी ७ वाजता सत्कार समारंभ होईल आणि रात्री ८ वाजता वेंगुर्त्यात प्रथमच भव्य 'शिमगोत्सव स्पर्धा २०२६' आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार आणि ५ हजार रुपये व चषक प्रदान करण्यात येतील. याव्यतिरिक्त संपूर्ण महोत्सवावर आधारित 'रिल्स स्पर्धा' देखील आयोजित केली असून यात ३ हजार व २ हजार रुपयांची बक्षिसे आहेत. विविध स्पर्धांच्या नोंदणीसाठी गौरव राऊळ (७८८८२००९११) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळाने केले आहे.