एक समृद्ध लोककला दशावतार पुस्तकाच्या माध्यमातून दशावतार कला प्रकाश झोतात. प्रा. खानोलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन.

एक समृद्ध लोककला दशावतार पुस्तकाच्या माध्यमातून दशावतार कला प्रकाश झोतात.  प्रा. खानोलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन.


      भारतातील प्रथमच, भारतीय भजन संमेलनाचा उद्घाटन समारंभ दादर माटुंगा कल्चरल सेंटर (डीएमसीसी) यशवंत नाट्यगृह शेजारी, माटुंगा  मुंबई येथे पार पडला. या वेळी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे उपस्थित होते.
     खानोलीतील प्रा. खानोलकर यांनी कोकणाचा अविभाज्य घटक असलेल्या दशावतार लोककलेवर संशोधनात्मक अभ्यास करून एक 'समृद्ध लोककला दशावतार' पुस्तकातून ही कलावाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. सदर पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्रातील डिंपल पब्लिकेशन7 मुंबई, अशोक मुळे आणि कौस्तुभ मुळे यांच्या माध्यमातून होणार आहे. या पुस्तकाला प्रस्तावना दशावतार लोककलेवर पहिली डॉक्टरेट मिळवणारे वेंगुर्त्यांचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध लेखक डॉ. अशोक भाईडकर यांची आहे.
     एक उत्कृष्ट लोककला- दशावतार या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ सिंधुदुर्गातील प्रख्यात डिझायनर महेंद्र जुवलेकर (श्याम आर्ट्स) यांनीकेले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ अप्रतिम असल्याची भावना यावेळी लोककला अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, भजन सम्राट लोकरे बुवा, भजन सम्राट हरयाण बुवा, मालवणी कवी दादा मडकईकर आदी मंडळी उपस्थित होती.
   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदीका रिद्धी म्हात्रे हिने केले. लवकरच हे पुस्तक रसिकांच्या भेटीला येणार आहे. आणि याच्या माध्यमातूनच वैविध्याने नटलेला दशावतार उलघडला जाणार आहे.