भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचा परूळे येथे जल्लोषमय शुभारंभ
परुळे
सावली फाउंडेशन सिंधुदुर्ग पुरस्कृत "ओम साई सुमित्रा स्पोर्ट चषक 2026" या भव्य नाईट अंडरग्राउंड क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा परुळे गव्हाणवाडी मैदानावर उत्साहात पार पडला. या स्पर्धेला पंचक्रोशीतील खेळाडू व क्रिकेटप्रेमी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.स्पर्धेतील आकर्षक बक्षिसांमुळे खेळाडूंमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. प्रथम पारितोषिक म्हणून ₹15,000 व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक ₹10,000 व चषक, तृतीय व चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी ₹2,500 ठेवण्यात आले आहे. याशिवाय मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा वैयक्तिक पुरस्कारांनी स्पर्धेची रंगत अधिक वाढवली आहे.या स्पर्धेचे उद्घाटन वेंगुर्ला पंचायत समितीचे सभापती सचिन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावली फाउंडेशनचे संस्थापक सचिन पाटकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात जमीन मालक व मान्यवर सुरेश सावंत, विजय घोलेकर, जगदीश तेंडोलकर, सुभाष दाभोलकर, रोहित म्हापणकर व रोशन परुळेकर यांचा शाल, श्रीफळ व कल्पवृक्ष रोप देऊन सत्कार करण्यात आला.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सोमेश सावंत, अण्णा सावंत, सुशांत सावंत, आदित्य सावंत, चंदन परुळेकर, रुपेश पाटकर, धीरज आंबडपालकर, गणेश लांबर, योगेश परुळेकर, गोविंद परुळेकर, भूषण पाटकर, मंदार लांबर, विठू लांबर व रुपेश लांबर यांनी विशेष परिश्रम घेतले.खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे आणि प्रेक्षकांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीमुळे ही स्पर्धा अविस्मरणीय ठरत असून पुढील सामने अधिक रंगतदार होणार असल्याची उत्सुकता व्यक्त होत आहे.
konkansamwad 
