स्वर्णिम कोकण संस्थेकडून तुळस गावातील अपंग युवकाला व्हीलचेअर प्रदान
तुळस
समाजसेवेचे एक प्रेरणादायी उदाहरण आज तुळस गावात पाहायला मिळाले. स्वर्णिम कोकण - सामाजिक संस्था, सिंधुदुर्ग - महाराष्ट्र (मर्या. रजि.) या सेवाभावी संस्थेने तुळस गावातील जकातनाका येथील अपंग युवक श्री. सागर सुनील तुळसकर यांना व्हीलचेअर प्रदान केली.अपंगत्वामुळे सागरला रोजच्या जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. पण आज या व्हीलचेअरमुळे त्याला स्वतःची कामे करता येतील, घरातून बाहेर पडता येईल आणि तो आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकू शकेल.स्वर्णिम कोकण संस्था गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा आणि गरजू, गरीब बांधवांसाठी निस्वार्थपणे कार्य करत आहे.तसेच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक मदत, अनाथ आश्रम आणि गरीब लोकांना सुद्धा मदत करत आहे.यावेळी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत गोळम,सचिव यासीर मकानदार पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी तुळस सरपंच सौ. रश्मी परब,जि. प. सदस्य सौ. सुजाता पडवळ, वैभव होडावडेकर, विक्रांत चुडजी, निलेश नागवेकर, साई परब,पिंट्या राऊळ, सुभाष सावंत,संतोष राऊळ, प्रदीप सावंत,संजय चुडजी,दर्शन तुळसकर आणि कुटूंबिय उपस्थित होते.या व्हीलचेअरच्या रूपाने फक्त एक साधन मिळाले नाही, तर एका माणसाला जगण्याची नवी उमेद आणि आत्मविश्वास मिळाला आहे. आज आम्हाला खूप आनंद होत आहे की, या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे एक छोटेसे पाऊल त्यांनी आज उचलले आहे असे मत सरपंच रश्मी परब यांनी व्यक्त केले. संस्थेच्या चांगल्या उपक्रमाचे जि. प.सदस्य सुजाता पडवळ यांनी कौतुक करत नेहमी सामाजिक कार्यात आपल्या सोबत सहभागी राहू असे आश्वासन दिले.
konkansamwad 
