उद्या सिंधुदुर्गात मोफत मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिर
सिंधुदुर्ग
पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून उद्या शनिवार, दि. 8 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग येथे मोफत मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने हे शिबिर आयोजित केले आहे.या शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.कार्डिओलॉजिस्ट, कार्डिअॅक सर्जन, न्यूरो सर्जन, प्लास्टिक सर्जन, ऑन्को सर्जन, युरो सर्जन, जनरल सर्जन, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, डेंटल सर्जन, हृदयरोग व मधुमेहरोग तज्ज्ञ, फुफ्फुसरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ.ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, हृदयाची 2D इको, ईसीजी, प्रयोगशाळा रक्त तपासणी आणि शालेय मुलांची आरोग्य तपासणी या सुविधा उपलब्ध असतील.तसेच शिबिराच्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत कार्ड, वयवंदना कार्ड व आभा कार्ड नोंदणीची सुविधाही देण्यात येणार आहे.
स्थळ : बाह्यरुग्ण विभाग (OPD), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग
दिनांक : शनिवार, दि. 08 ऑगस्ट 2026
वेळ :सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत
konkansamwad 
