डॉ. दिनेश नागवेकर यांना 'भंडारी समाजरत्न' पुरस्कार प्रदान

डॉ. दिनेश नागवेकर यांना 'भंडारी समाजरत्न' पुरस्कार प्रदान

 

सावंतवाडी

 

      तालुका भंडारी मंडळाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित "भंडारी समाजरत्न" पुरस्कार डॉ. दिनेश नागवेकर यांना मान्यवरांच्या हस्ते अत्यंत उत्साहात प्रदान करण्यात आला. डॉ. नागवेकर हे सावंतवाडी भंडारी मंडळाचे संस्थापक सेक्रेटरी असून त्यांनी मंडळाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीचा नकाशा तयार करण्यापासून ते संपूर्ण बांधकामाच्या पर्यवेक्षणापर्यंतचे काम विनामूल्य पार पाडले आहे. त्यांच्या या निष्ठावंत आणि अतुलनीय समाजसेवेची दखल घेऊनच त्यांचा हा विशेष गौरव करण्यात आला.या पुरस्कार वितरण सोहळ्यास भंडारी जिल्हा महासंघाचे अध्यक्ष हेमंत कळंगुटकर, सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, माजी शिक्षण सभापती गुरूनाथ पेडणेकर आणि जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय देविदास आडारकर, संजय पिळणकर, उदय पारिपत्ये, नंदकिशोर कोंडये, महेश धुरी, हनुमंत पेडणेकर, ज्ञानदीप राऊळ, विकी केरकर, सुनिता पेडणेकर, देव्या सुर्याजी यांच्यासह मंडळाचे अनेक सदस्य आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. दिनेश नागवेकर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.