सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी नगरपरिषदेची ABC-ARV मोहीम.....निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण करून मूळ ठिकाणीच सोडणार

सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी नगरपरिषदेची ABC-ARV मोहीम.....निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण करून मूळ ठिकाणीच सोडणार

सावंतवाडी 

 

      शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रित करणे तसेच नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता राखण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेअंतर्गत Animal Birth Control - ABC आणि Anti Rabies Vaccination - ARV अंतर्गत शहरातील विविध प्रभागांमधील भटक्या कुत्र्यांना मानवीय पद्धतीने पकडण्यात येत आहे. त्यांचे निर्बिजीकरण आणि रेबीजचे लसीकरण केल्यानंतर नियमांनुसार त्यांना त्यांच्या मूळ परिसरातच पुन्हा सोडण्यात येणार आहे.या उपक्रमामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळण्यास, रेबीजचा धोका कमी होण्यास आणि मानव व प्राण्यांमधील सहअस्तित्व अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले.सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्षा श्रीम. श्रद्धा लखमराजे भोसले यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.  
- कुत्रे पकडण्याच्या कार्यात अडथळा निर्माण करू नये  
- भटक्या कुत्र्यांची माहिती, वास्तव्य किंवा समस्या असल्यास नगरपरिषदेस कळवावी  
- पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी आपल्या पाळीव कुत्र्यांचे नियमित लसीकरण करून आवश्यक काळजी घ्यावी  
- कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता नगरपरिषदेच्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे  

     नागरिकांच्या सहकार्यामुळे शहरात सुरक्षित, निरोगी व संतुलित पर्यावरण निर्माण करण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.