परुळे येथे १०वी-१२वीतील गुणवंतांचा सत्कार.....परुळे हायस्कूलचा १००% निकालाबद्दल गौरव 

परुळे येथे १०वी-१२वीतील गुणवंतांचा सत्कार.....परुळे हायस्कूलचा १००% निकालाबद्दल गौरव 

परुळे


    श्री देव आदिनारायण विकास सेवा सोसायटी परुळे आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक परुळे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी व 12वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.  

 10वी बोर्ड परीक्षा
 कुडाळ तालुक्यातून प्रथम: कु. दिया निलेश सामंत  
 परुळे हायस्कूल: 
    1.  प्रथम: कु. अवंतिका अमेय देसाई  
    2.  द्वितीय: कु. विशाखा प्रभू पंचलिंग  
    3.  तृतीय: कु. श्रुती मधुकर राणे  

12वी बोर्ड परीक्षा  
     सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम: कु. गायत्री विवेकानंद बागलकर  
     पाट हायस्कूल
    1.  प्रथम: कु. अर्पिता अमेय सामंत  
    2.  द्वितीय: कु. दिक्षा परब  
    3.  तृतीय: कु. शाल्मली शंकर घोगळे  


      परुळे हायस्कूलचा यंदाचा 10वीचा निकाल 100% लागल्याबद्दल शाळेचाही विशेष सत्कार करण्यात आला. सर्व गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.यावेळी सोसायटीचे चेअरमन निलेश सामंत, व्हा. चेअरमन प्रसाद पाटकर, शाळा व्यवस्थापन संस्थेचे अमेय देसाई, बँक अधिकारी हंजनकर, संचालक प्रकाश चव्हाण, शंकर राठीवडेकर, विठोबा राणे, महादेव साफळे, रामकृष्ण मेस्त्री, संतोष परुळेकर, सहदेव कदम, सुवर्णा सावंत, सचिव चंद्रकांत सावंत, कर्मचारी रूपा करलकर आदी उपस्थित होते.  या उपक्रमाबद्दल सोसायटीच्या सर्व पालक वर्गातून आभार व समाधान व्यक्त करण्यात आले.