परुळे येथे प्रधानमंत्री आवास योजना मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम संपन्न

परुळे येथे प्रधानमंत्री आवास योजना मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम संपन्न

 

वेंगुर्ला

 

         वेंगुर्ला येथील परुळे गावात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मधील मंजूरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, मुख्य सेविका शर्मिष्ठा सामंत, सदस्य प्रदीप प्रभू, नमिता परुळेकर, सीमा सावंत, सुनाद राऊळ, ग्रामसेवक शरद शिंदे, आरोग्य समुदाय अधिकारी काजल परब, आरोग्य सेवक एस. आर. चव्हाण, माजी सरपंच प्राजक्ता चीपकर आदींसह लाभार्थी उपस्थित होते. यावेळी सरपंच यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण देखील करण्यात आले. राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या प्रसारणाची देखील व्यवस्था उपस्थितांसाठी करण्यात आली होती.  सर्वसामान्य माणूस नेहमी स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहतो. हे स्वप्न देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री जय कुमार गोरे या सगळ्यांच्या माध्यमातून पूर्ण झाले असल्याने मी त्यांचे मनापासून आभार मानते तसेच गरजू कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेने समर्पित भावनेने काम करावे. लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यापासून ते त्यांच्या गृह प्रवेशापर्यंतची सर्व कामे वेळेत व गतीने पूर्ण करावीत असे आवाहन परुळे सरपंच यांनी केले.