केळुसच्या आकाश फिश अँड ऑईल कंपनीत २५ जणांचे रक्तदान......कर्मचाऱ्यांचा समाजसेवेला हातभार
वेंगुर्ले
केळुस येथील माळरानावर असलेल्या आकाश फिश अँड ऑईल कंपनी आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढी व विघटन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात कंपनीतील एकूण २५ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. यामध्ये कामगारांसह ऑफिस स्टाफचाही सहभाग होता. रक्तदानानंतर बोलताना कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आपण दिलेल्या रक्ताने एखाद्या रुग्णाचे आयुष्य वाचू शकत असेल तर हे काम खूप मोठे आणि पुण्याचे आहे. कंपनीने सामाजिक बांधिलकी जोपासत असे उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या वतीने वैद्यकीय पथक उपस्थित होते. यात डॉ. उन्नती लटकर, सुमंगल बुगडे तसेच भूषण मळेकर, पूजा तेली, सिद्धी जाधव, अक्षय सावंत, प्रथमेश घाडी, नितेश पाटील, नितीन गावकर आदींचा समावेश होता. कंपनीच्या व्यवस्थापनाने रक्तदात्यांचे आभार मानले आणि भविष्यातही असे समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
konkansamwad 
