खासकीलवाडा शिल्पग्राम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे - आशिष सुभेदार

खासकीलवाडा शिल्पग्राम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे - आशिष सुभेदार

 

सावंतवाडी

 

         सावंतवाडी खासकीलवाडा शिल्पग्राम परिसरात सतत कचरा टाकला जात असल्यामुळे तिथे आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी या परिसरात दुर्गंधी पसरून रोगराई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात नगरपालिकेडून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे युवा कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी केली आहे.गेल्या काही दिवसांपासून  खासकीलवाड्याबाहेरील नागरिकांकडून या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा होत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरते, बऱ्याचवेळा तिथे आगही लागली आहे. सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता केली जात असूनही ही समस्या उद्भवत आहे. याला आळा घालण्यासाठी तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कचरा करणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे जाईल. त्याचबरोबर या परिसरात काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी जेणेकरून या गोष्टीवर देखरेख ठेवणे सोपे जाईल. इतके करून देखील जर कोणी परिसर अस्वच्छ केला तर त्याला धडा शिकवू असा इशारा आशिष सुभेदार यांनी दिला आहे.