परुळे बाजार तंटामुक्त समिती अध्यक्षपदी विजय परब यांची बिनविरोध निवड

परुळे बाजार तंटामुक्त समिती अध्यक्षपदी विजय परब यांची बिनविरोध निवड

परुळे बाजार

 

     परुळे बाजार ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी विजय परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीची पुनर्रचना करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी विजय परब यांचे नाव सूचवण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांनी एकमताने त्यांच्या नावाला अनुमोदन दिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.गावातील शांतता, सलोखा आणि सामाजिक एकोपा कायम राखण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी उपसरपंच प्राजक्ता पाटकर, सदस्य प्रदीप प्रभू, संजय दूधवडकर, अभय परुळेकर, तन्वी दूधवडकर, सुनाद राऊळ, नमिता परुळेकर, सीमा सावंत, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे विकास चव्हाण, कृषी सहाय्यक सूरज परब यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवनिर्वाचित अध्यक्ष विजय परब यांचे ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.