वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
वेंगुर्ले
"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!" असा महामंत्र देऊन मरणासन्न समाजाला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने तालुका कार्यालयात तसेच शहरातील आनंदवाडी येथील समाज मंदिरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. वेंगुर्ला भाजप मार्फत भाजप कार्यालय वेंगुर्ला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा प्रभुखानोलकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत तसेच भारताच्या संविधनाबाबत प्रेरणादायी विचार सर्वांसमोर मांडले.तसेच वेंगुर्ले शहरातील आनंदवाडीतील समाज मंदिरात जाऊन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, नगराध्यक्ष राजन गिरप, उप नगराध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, मच्छीमार जिल्हा संयोजक तथा तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, तालुका सरचिटणीस राजबा सावंत, गौरी माईणकर, काजल कुबल, सचिन शेट्ये, सदानंद गिरप, नगरसेवक दाजी परब, पंचायत समिती सदस्य संकेत धुरी, नगरसेवक युवराज जाधव, वामन जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
konkansamwad 
