सावंतवाडीतील केसरी येथे वनरक्षक युवतीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

सावंतवाडीतील केसरी येथे वनरक्षक युवतीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

सावंतवाडी


     सावंतवाडी तालुक्यातील केसरी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या युवतीने रविवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने वनविभागासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.मृत युवतीचे नाव आश्लेषा सागर मांगले असे आहे. त्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील लाकूडवाडी येथील रहिवासी होत्या. बी.एस्सी. पर्यंत शिक्षण घेतलेल्या आश्लेषा यांची सुमारे तीन वर्षांपूर्वी वनखात्यात वनरक्षक पदावर नियुक्ती झाली होती. गेल्या काही काळापासून त्या केसरी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत होत्या.रविवारी दिनांक १६ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या ठिकाणी गळफास घेतली. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणी अंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.या प्रकरणाचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.