वेंगुर्ला भाजपतर्फे आडेली येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम

वेंगुर्ला भाजपतर्फे आडेली येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम

 

वेंगुर्ला

 

       भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला ४६ वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधत वेंगुर्ला भाजपने सेवा सप्ताह म्हणून विविध प्रकारचे समाजपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आडेली भाजप व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र आडेली येथे रुग्णांना फळे वाटपाचा उपक्रम करण्यात आला.रुग्ण सेवेसाठी भाजप पक्ष नेहमीच सोबत रहाणार असल्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष व माजी सरपंच समिधा कुडाळकर, आडेली उपसरपंच परेश हळणकर, वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघ संचालक समीर कुडाळकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश सामंत, पप्पू धर्णे, सुधीर मुंडये, समीर गडेकर, डॉ.अश्विनी माईणकर, डॉ. संजीवनी पाटिल तसेच कर्मचारी वर्ग व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.