जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिमेला गती ३० ऑक्टोबर पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येणार

जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिमेला गती ३० ऑक्टोबर पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येणार

सिंधुदुर्ग, दि. २५ (जिमाका)

 

        राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सन २०२७ पर्यंत कुष्ठरोग संक्रमण शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात Focused Leprosy Campaign (FLC) व Contact Survey राबविण्यात येत आहे. ही विशेष मोहीम १६ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत येणार असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी निलेश मठकर यांनी कळविले आहे.समाजामध्ये लपलेले कुष्ठरोग रुग्ण लवकर शोधणे, निदान झालेल्या रुग्णांच्या निकट सहवासितांची तपासणी करणे, विशेषतः बालकांमधील कुष्ठरोगाचे प्रमाण कमी करणे तसेच MB कुष्ठरुग्ण आणि विकृती असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी या मोहिमेत विशेष भर देण्यात आला आहे.मागील पाच वर्षांत, म्हणजेच सन २०२१ पासून निदान झालेल्या कुष्ठरोग रुग्णांच्या सहवासितांचे Contact Survey करण्यात येणार आहे. तसेच FLC अंतर्गत विशेष जोखीम असलेल्या भागांमध्ये व गटांमध्ये लक्ष केंद्रित करून सर्वेक्षण केले जाणार आहे.जिल्ह्यात यावर्षी NLEP Zero Leprosy Village Survey घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणात कुष्ठरोग आढळलेल्या गावांमध्ये Focused Leprosy Campaign राबविण्यात येणार आहे. संबंधित गावांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून संशयित व्यक्तींचा शोध घेण्यात येणार असून, सर्वेक्षणाची माहिती नियमितपणे Google Sheet मध्ये अद्ययावत करण्यात येणार आहे.शहरी भागात कणकवली, मालवण, सावंतवाडी व वेंगुर्ला येथील कुष्ठरोगाचे रुग्ण आढळलेल्या भागांमध्ये विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या भागातील शेजारील किमान २०० घरांना भेट देऊन सर्वेक्षण  करण्यात येणार आहे. Focused Leprosy Campaign अंतर्गत बालकांमध्ये कुष्ठरोग आढळण्याची शक्यता असलेली क्षेत्रे, MB कुष्ठरुग्णांच्या संपर्कातील सहवासित, मागील पाच वर्षांत कुष्ठरोग आढळलेल्या कुटुंबातील सहवासित, Gr-I व Gr-II विकृती असलेल्या कुष्ठरुग्णांच्या संपर्कातील सहवासित तसेच कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त असलेली गावे, पाडे व वॉर्ड यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.सर्वेक्षणादरम्यान कुष्ठरुग्णांच्या संपर्कातील पात्र व्यक्तींना PEP (Post-Exposure Prophylaxis) देण्यात आली आहे किंवा नाही, याची तपासणी करण्यात येणार आहे. PEP न घेतलेल्या पात्र सहवासितांची वैद्यकीय तपासणी करून नियमानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार देण्यात येणार आहेत.कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास किंवा कुष्ठरोगी व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घेणे आवश्यक आहे. लवकर निदान आणि योग्य उपचारामुळे विकृती टाळण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सर्वेक्षण पथकांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.