कणकवली नगराध्यक्ष निवडणूक संदेश पारकर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून लढणार

कणकवली नगराध्यक्ष निवडणूक संदेश पारकर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून लढणार

 

कणकवली

 

         नगरपंचायत निवडणूक आम्ही पक्षाच्या चिन्हावर लढविणार नाही. तर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत. नगराध्यक्ष निवडणुकीसह आघाडीतील सर्व उमेदवारांना एकच चिन्ह मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शहरातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि दहशतीचे राजकारण यामुळे शहरवासीय त्यांना कंटाळले आहेत. त्यामुळे मला इतर सर्व पक्षांबरोबर भाजपमधील अनेक कार्यकर्ते आणि आरएसएस संघटचेही पाठिंबा निश्चित मिळेल असा विश्वास शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी व्यक्त केला.
         श्री. पारकर म्हणाले, नगराध्यक्ष तसेच इतर सर्व १७ प्रभागातील शहर विकास आघाडीचे उमेदवार हे सोमवारी १७ नोव्हेंबरला आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. आम्हाला तिरंगी लढती नको होत्या. मागची निवडणूक तिरंगी झाली. यात आम्हाला थोडक्या मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे प्रत्येक प्रभागात आघाडीचा एकच उमेदवार निश्चित व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास विलंब झाला. मात्र आता आम्ही सर्वच पक्ष आणि शहरातील सामाजिक संस्था मिळून एकत्र आलो आहोत. शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. त्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख पद देखील मी पंधरा दिवस बाजूला ठेवले आहे. दरम्यान शहर विकास आघाडीतील उमेदवारांना एकच चिन्ह मिळावे यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेणार आहोत.