शिवसेना उबाठा कणकवलीच्या वतीने १७ मार्च रोजी छ. शिवाजी महाराज जयंती

कणकवली
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कणकवली तालुका यांच्यावतीने सोमवार दि 17 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त विविध कार्यक्रम व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना, शिवरायांवर आधारित वेशभूषा स्पर्धा, शिवकालीन खेळ यांचे प्रात्याशिक व शोभायात्रा अश्या विविध कार्यक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. वेशभूषा स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 5,000, द्वितीय पारितोषिक 4,000, तृतीय पारितोषिक 3,000 व उत्तेजनार्थ प्रथम 1,000, उत्तेजनार्थ द्वितीय 1,000 अशी पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी तेजस राणे - (8421711441) धीरज मेस्त्री, उद्धव पारकर यांच्याशी संपर्क साधावा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमास मोठया उपस्थित रहावे असे आवाहन रुपेश नार्वेकर व तेजस राणे यांनी केले आहे.