कणकवली शहरात घरफोडी

कणकवली शहरात घरफोडी


 

कणकवली
 

    कणकवली शहरातील कनकनगर येथील कोरगांवकर यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली आहे. या चोरीत अंदाजे तीन लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच गणपतीची मूर्ती चोरट्याने लंपास केली. समृद्धी कोरगांवकर या आपल्या कर्तव्यावर गेल्या होत्या. तर पती, सासरे आणि मुलगा हे मालवण येथे नातेवाईकांकडे गेले होते. यावेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्याने घराच्या पुढील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश केला. या घटनेबाबत समृद्धी कोरगावकर यांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे. घरातील सामानाची सौ. कोरगांवकर यांनी पाहणी केली असता, कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेल्या स्थितीत आढळले. यामध्ये सोन्याचे मंगळसुत्र ६.५ तोळे (६५ ग्रॅम), सोन्याची चैन १३ ग्रॅम, लहान मुलाची चांदीची साखळी ५०० रुपये, गणपतीची चांदीची मूर्ती १००० रुपये अशी एकूण ३ लाख १५ हजार रुपयांची चोरी झाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करत आहेत.