कुशेवाडा माजी सरपंच भास्कर राऊळ यांचे अल्पशा आजाराने निधन

कुशेवाडा माजी सरपंच भास्कर राऊळ यांचे अल्पशा आजाराने निधन

 

वेंगुर्ला

 

     कुशेवाडा देऊळवाडी येथिल रहिवासी, भक्ति मंगल कार्यालयचे मालक कुशेवाडा ग्रामपंचायत माजी सरपंच व परुळे येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवस्थानचे मुख्य पुजारी भास्कर वामन राऊळ वय ७५ वर्षे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलाचे देखील अचानक निधन झाले होते. त्यात करुन त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटूबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा स्वभाव हसरा मनमिळावू असल्याने त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. काहि वर्षांपूर्वीच पत्नीचे देखील निधन झाल्याने कुटुंबांचा आधार हरपला असल्याची भावना राऊळ कुटुंबीयांकडून व्यक्त केली जात आहे. परुळे कुशेवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.