मदर तेरेसा स्कूलची दिया धुरी ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत तालुक्यात दुसरी.

वेंगुर्ला.
तालुक्यातील दाभोली नाका येथील मदर तेरेसा इंग्लिश मिडीयम स्कुलच्या इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेल्या दिया धुरी हिने इंग्रजी माध्यमातून ब्रेन डेव्हलपमेंट (बीडीएस) परीक्षेत तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. ७ जानेवारीला झालेल्या या परीक्षेत दियाने १०० पैकी ८७ गुण मिळवुन तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला असून तिने ब्राँझ मेडल प्राप्त केले आहे. दियाला शिक्षक व पालक अदिती धुरी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो तसेच शिक्षक,पालक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.या यशाबद्दल दिया चे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.