महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती

महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती


मुंबई 
    काँग्रेस हायकमांडकडून  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडी चे समन्वयक म्हणून बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.गेले चार पाच दिवस महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत काँग्रेस पक्षाध्यक्ष नाना पटोले व उठाबा सेनेचे संजय राऊत यांच्यात खडाजंगी झाल्याच्या बातम्या आल्या वरुन काँग्रेस व शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असतानाच काँग्रेसचे निरीक्षक यांनी हस्तक्षेप करून दिलजमाई करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.याच पाश्र्वभूमीवर महाविकास आघाडीत आलेबेल नसल्याचे दिसून येत असतानाच आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींनी राज्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब थोरात यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले होते.हायकमांडने आज सायंकाळी तातडीने महाराष्ट्रातील तिढा सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून  बाळासाहेब थोरात यांना काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.यामुळे काँग्रेस हायकमांडने पक्षाध्यक्ष नाना पटोले  यांना मोठा धक्का दिला असल्याचे मानले जात आहे.