वेंगुर्ला आनंदवाडी येथे मनुस्मृती दहन व महिला मुक्ती दिन साजरा.

वेंगुर्ला.
सावित्रीबाई महिला मंडळ आनंदवाडी वेंगुर्ला, दलित सेवा मंडळ आनंदवाडी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा वेंगुर्ला आनंदवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने २५ रोजी समाज मंदिर आनंदवाडी वेंगुर्ला येथे मनुस्मृती दहन व महिला मुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुहानी जाधव, उपाध्यक्ष गीतांजली जाधव, सचिव यशस्वी जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित केले.
यावेळी महिला मंडळ अध्यक्ष सुहानी जाधव, तसेच जयंती उत्सव समिती सचिव अमोल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर वाय. जी. कदम यांनी आपले विचार मांडले आजची स्त्री ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज राष्ट्रपती, पायलट, पंतप्रधान, होवू शकते, आजची स्त्री सज्ञान आहे.बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन केले हि खरी क्रांती घडवून आणली, महिलांना मनुस्मृती च्या कायद्यातून मुक्त केले म्हणून २५ डिसेंबर हा दिवस महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळी पुनम जाधव, दीप्ती जाधव, रिया जाधव, मानसी जधव, सुकन्या जाधव, आरती देसाई, सुमित्रा वराडकर, सुवर्णा जाधव, छाया सागर, मनाली जाधव, आरती जाधव, उज्वला जाधव, सुनेत्रा जाधव, लीलावती जाधव, सोनिया जाधव, सुचिता कदम, तनिष्का जाधव, सई जाधव, प्रांजल जाधव, नित्या देसाई, काव्या जाधव, जयंती उत्सव समिती अध्यक्ष किरण जाधव, दलित सेवा मंडळ अध्यक्ष सुहास जाधव, वाय.जी.कदम, गौतम जाधव,अमोल जाधव आदी धम्म बांधव - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वृषाली जाधव यांनी मानले.