भावगीत गायन स्पर्धेत अमृता पेडणेकर प्रथम

भावगीत गायन स्पर्धेत अमृता पेडणेकर प्रथम


    राधारंग फाउंडेशन प्रस्तुत आणि परुळे युवक कला क्रीडा मंडळ यांच्यातर्फे भावगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत एकूण बारा स्पर्धक सहभागी होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे प्रथम क्रमांक अमृता पेडणेकर रु ३०००, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक सुनिल गोवेकर रु. २५०० सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक अमोल वाईरकर - रु. २००० सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र, चतुर्थक अभंग वैष्णवी धुरी - रु. १००० सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले.
       स्पर्धेचे परीक्षण ऍड. दिलीप ठाकूर, श्री. अजित गोसावी यांनी केले. ही स्पर्धा दोन फेऱ्यात घेण्यात आली. ऍड. प्रमोद देसाई, सौ. अरुणा सामंत,डॉ. उमाकांत सामंत, अविनाश देसाई मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.