परुळेबाजार गावाचा 'ग्राम परिवर्तन दिन' एक् अनोखा उपक्रम.
परुळे
परुळेबाजार ग्रामपंचायत तर्फे ग्राम परिवर्तन दिन साजरा करण्यात आला. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने एक नवीन संकल्पना राबवित ग्रामपंचायतने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत जेष्ठ नागरिक यांचा सन्मान करण्यात आला. गावात आलेल्या नवविवाहितांचा सन्मान तसेच नवीन जन्मलेले मुलगी मुलगे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, माजी सरपंच तथा सदस्य प्रदीप प्रभू सीमा सावंत, पूनम परुळेकर, नमिता परुळेकर, तंटामुक्त अध्यक्ष पुरुषोत्तम प्रभू, ग्रामसेवक शरद शिंदे, आरोग्य अधिकारी काजल परब, सेविका आरआर पिंगूळकर यासह अंगणवाडीसेविका आशा सेविका जेष्ठ नागरिक आदींसह महिला उपस्थित होते.
ग्रामपंचायत ने राज्य स्तरावर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत प्रथम क्रमांक मिळवला त्यांचे बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी संभाजी नगर येथे जातांना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना त्यांच्या आदर्श गाव राळेगणसिद्धी येथे भेट दिलीं. यावेळी त्यांनी आपल्या गावाचा वाढदिवस साजरा करण्यात येत असल्याबाबत माहिती दिली त्याला ग्राम परिवर्तन दिन म्हणुन साजरा करण्यात येतो तीच संकल्पना आपल्या गावात राबवावी यादृष्टीने पाऊल उचलले आहे. त्यामुळे गावात एक वेगळा संकल्पना राबवली जात आहे. यावेळी जेष्ठ नागरिक यांच्या सन्मान करण्यात आला. नवविवाहित सुना. तसेच नवजात मुली यांचा यथोचित गौरव करण्यात आला. जे जेष्ठ नागरिक प्रकृती कारणास्तव येऊ शकले नाहीत त्यांच्या घरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला. व सन्मान करण्यात आला.