वेंगुर्ले शिवसेनेची ७ डिसेंबर रोजी मासिक सभा
वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुका शिवसेनेची मासिक सभा १२ ऐवजी रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सप्तसागर कॉम्लेक्समधील शिवसेना शाखा कार्यालयात होणार आहे.या सभेत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत तसेच पक्षीय संघटनेबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत.
नुकतीच वेंगुर्ले नगर पालिकेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेच्या ग्रामीण व शहर भागातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह घराघरात पोहोचविण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. २१ तारीखला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पण, त्यापूर्वीच होऊ घातलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसंदर्भात योग्य ती रणनिती आखणे, शहर व ग्रामीण भागातील शिवसेना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेनेच्या तालुका, शहर, महिला आघाडी, युवासेना या सर्व आघाड्यांचे सर्व पदाधिकारी, ग्रामीण भागातील विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांनी या सभेला वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी केले आहे.

konkansamwad 
