वेंगुर्ले येथील बाल आनंद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

आधार फाऊंडेशन व वेंगुर्ले गॅस एजन्सी यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्याला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 6 ते 11 वयोगटातील बालकांसाठी घेण्यात आलेल्या अनोख्या रांगण्याच्या स्पर्धेनेही मेळाव्याला रंगत आणली. 3 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी सुदृढ बालक स्पर्धा व 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी बडबडगीत व वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आलेला.
आधार फाऊंडेशनच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन आधार फाऊंडेशनच्या अध्यक्षा माधुरी वेंगुर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष किरण वेंगुर्लेकर, खजिनदार डॉ. वंदन वेंगुर्लेकर, सदस्य सौ. कावेरी वेंगुर्लेकर, सौ. वैदेही वेंगुर्लेकर, सहसचिव सगुण मातोंडकर, निवृत्त शिक्षक जयराम वायंगणकर, नगर वाचनालयाचे कार्यवाह कैवल्य पवार, प्रा. महेश बोवलेकर, वसंत तांडेल, डॉ. वसुधा मोरे, सोनाली सावंत, गीता गवंडे, प्रा. वसंत नंदगिरीकर, कर्पूरगौर जाधव, महेंद्र मातोंडकर, शिवराज वेंगुर्लेकर, स्मिता कोनेकर, भानु मांजरेकर, किशोर सावंत आदी उपस्थित होते. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव नंदन वेंगुर्लेकर यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे.
रांगण्याची स्पर्धा (वयोगट ६ ते ११ महिने) प्रथम - अद्वैत समीर ओगले, द्वितीय- गौरी सुशांत खानोलकर, तृतीय - रुद्रा श्रीकृष्ण हळदणकर, उत्तेजनार्थ- भार्गवी यशवंत कुर्ले, दुविका गौरव रगजी व मनस्वी सुधीर जाधव.सुदृढ बालक स्पर्धा (वयोगट ३ वर्षाखालील) प्रथम- श्लोक प्रितम साळगावकर, द्वितीय- घना चतुर पार्सेकर, तृतीय - कुश विश्वनाथ खराडे, उत्तेजनार्थ - हितांशु दत्तात्रय गोळम व अर्जुन प्रदीप जाधव.
बडबडगीत स्पर्धा (वयोगट ३ ते ६ वर्ष) प्रथम- जिवीका शंकर आंदुर्लेकर, द्वितीय- सार्थक भूषण लांजेकर, तृतीय - प्राप्ती मच्छींद्रनाथ मोरे, उत्तेजनार्थ- आरोही धाकू चव्हाण व सानवी सागर खराडे.वेशभूषा स्पर्धा (वयोगट ३ ते ६ वर्ष) प्रथम - कनिका कुणाल इंदुलकर, द्वितीय- जिवीका शंकर आंदुर्लेकर, तृतीय - युगा अमोल मसुरकर, उत्तेजनार्थ- श्लोक सहदेव परब व ज्ञानेश्वरी तायाप्पा करे.
नगर वाचनालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या बाल आनंद मेळाव्यात आधार कन्सल्टन्सी आणि फायनाशियल सर्व्हिसेस व वेंगुर्ले गॅस सर्व्हिस यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेचे बक्षीस वितरण हे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आनंद मेळाव्यात एकूण 96 मुलांनी सहभाग घेतला होता.