आकाश फिश अॅन्ड ऑईल कंपनीतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले
केळुस येथील माळरानावर असलेल्या आकाश फिश अॅन्ड ऑईल कंपनी व जिल्हा रूग्णालय रक्तकेंद्र व विघटन केंद्र यांच्यावतीने २१ जुलै रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरास कंपनीतील एकूण ३२ लोकांनी रक्तदान केले ज्यामध्ये कामगार व ऑफिस स्टाफ यांचा समावेश होता. यावेळी बोलताना कंपनीचे मॅनेजर राजाराम बेदरकर म्हणाले की, एखाद्या रूग्णाचे आयुष्य या रक्तदान शिबिराच्या रक्ताने वाचू शकत असेल तर हे काम कितीतरी मोठे आहे. तसेच आपण सर्वांनी या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली भंडारे, अधिपरिचारिका श्रीम. निता आरोलकर, समाजसेवा अधिक्षक नितीन तुरनर, श्रीम.मयुरी शिंदे, श्रीम.ऋतुजा हरमलकर, नितेश पाटील, प्रथमेश घाडी, नितीन गावकर, डॉ.अभिषेक गुप्ता, आकाश फिश अॅन्ड ऑईल कंपनीचे मॅनेजर राजाराम बेदरकर, फरहान आचरेकर, सुजित केळुसकर, रमिज शेख आदि उपस्थित होते.