विद्यामंदिर परुळे येथे विद्यार्थीनींना आरोग्य विषयक मार्गदर्शन व सॅनीटरी नॅपकिनचे वाटप

विद्यामंदिर परुळे येथे विद्यार्थीनींना आरोग्य विषयक मार्गदर्शन व सॅनीटरी नॅपकिनचे वाटप


परुळे 
    'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या अभियानांतर्गत शाळांमधून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. आजचे विदयार्थी हे देशाचे भावी नागरिक आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आरोग्य विषयक चांगल्या सवयी लागाव्यात, निरोगी व सदृढ भावी नागरीक घडावेत या उद्देशाने परुळे येथील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे येथे आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 
    मुलींना आरोग्य विषयक अनेक समस्यांना तोंड दयावे लागते. त्यामुळे त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने त्यांच्यासाठी खास आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होतो. डॉ. तेजस्विनी अभयकुमार देसाई यांनी विद्यार्थीनींना मासिक पाळी, संतुलित आहार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी 'विकासनी
स्माईल फाऊंडेशन' या स्वयंसेवी संस्थेमार्फत वि‌द्यार्थीनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. या संस्थेच्या संस्थापक श्रीम. विशाखा सामंत यांनीही वि‌द्यार्थीनींना मार्गदर्शन केले.
    या कार्यक्रमास या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देसाई, संस्थेचे सीईओ श्री. अमेय देसाई, श्री. मंगेश सामंत, श्री. प्रभाकर सामंत, ॲड. अभयकुमार  देसाई, श्री. ओंकार देसाई, मुख्याध्यापक श्री. सचिन माने, प्रशालेतील सर्व शिक्षिका आणि सर्व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. मार्गदर्शनानंतर सर्व विद्यार्थीनींनी आनंद व समाधान व्यक्त केले.